इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान मंथन परीक्षेत बाजी मारली



चंद्रपूर : भारतातील सर्वात मोठ्या विज्ञान प्रतिभा शोध चाचणी 'विद्यार्थी विज्ञान मंथन-2022' मध्ये स्थानिक इंदिरा गांधी गार्डन शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक तर दोन विद्यार्थ्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. 
जिल्हास्तरावर प्रथम  आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता  नववीच्या  आरुष सिद्धमशेट्टीवार आणि इयत्ता सहावीतील  ऋतुजा मानकर यांचा समावेश आहे. ह्याच परीक्षेत  इयत्ता आठवीतील सुहानी काळसकर ही दुसरी तर इयत्ता  दहावीची निधी तुममुलवार तिसरी आली आहे .
विद्यार्थी विज्ञान मंथन हे राष्ट्रीय स्तरावरील  ऍप  आधारित विज्ञान प्रतिभा शोध चाचणी इयत्ता सहावी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन घेतली जाते. विज्ञान शिक्षक नितीन जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या एकूण 29 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षेत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर इयत्ता सहावीतून जिल्ह्यात प्रथम आलेली ऋतुजा मानकरची राज्यस्तरीय शिबिरात सहभागी होण्यासाठी निवड झाली आहे.
या चार विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेतील मुख्याध्यापक बावनी जयकुमार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राहुल पुगलिया, समितीचे पदाधिकारी व सदस्य, शाळेचे प्रशासक जयकुमार सर, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post