स्व.डॉ.व्ही.एम.येरगुडे ह्यांच्या जयंती प्रित्यर्थ " रक्तदान शिबीर


चंद्रपूर:- स्व.एम.डी.येरगुडे स्मृती शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपुर अंतर्गत संचालित श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर येथे संस्थेचे संस्थापक स्व.डॉ.विठ्ठलराव एम.येरगुडे ह्यांच्या जयंती प्रित्यर्थ "रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबीर" आयोजित करण्यात आली.
ह्याप्रसंगी कार्यक्रमाचे मार्गदर्शक आणि प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपुर महानगरपालिका चंद्रपुरचे आयुक्त विपीन पालिवाल साहेब,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विद्या एम.येरगुडे मॅम, प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सचिव अमित व्ही.येरगुडे सर,संस्थेचे उपाध्यक्ष अभिषेक व्ही.येरगुडे सर तसेच डॉ.शशिकांत बेरशेट्टीवार (दंत चिकित्सक),डॉ.मनीष मोते, डॉ.विनोद गोरंटीवार सर ( प्राचार्य,श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय लोणारा ),संजीवनी रक्तपेढीच्या संचालिका डॉ.रीमा निनावे मॅम आणि संस्थेचे प्राचार्य राजेश एम.पेशट्टीवार प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून स्व.डॉ.विठ्ठलराव येरगुडे साहेब ह्यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.ह्यांनंतर प्राचार्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेविषयी माहिती देऊन स्व.डॉ.विठ्ठलराव येरगुडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.विपीन पालिवाल साहेबांनी संस्थेच्या आणि साहेबांच्या कार्याचा गौरव करून आपले विचार व्यक्त करीत विद्यार्थ्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले त्यानंतर आरोग्य शिबिराचे उदघाटन करून शिबिराला सुरुवात झाली ह्यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य तपासणी, दंत तपासणी करीत रक्तदान केले ह्यावेळी डॉ.शशिकांत बेरशेट्टीवार,डॉ.मनीष मोते आणि डॉ.रिमा निनावे ह्यांचे सहकार्य लाभले.संस्थेचे सचिव मा.अमित सर ह्यांनी साहेबांच्या कार्याचा उल्लेख करीत भविष्यात अधिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले.संस्थेतर्फे सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक धन्यवाद करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Post a Comment (0)
Previous Post Next Post