दोन दुचाकीसह चोरट्यास अटक



चंद्रपूर:- स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाच्या मेन गेटच्या बाजुला असलेली रोडवरून दुचाकी गाडी चोरून नेणा-या चोरट्याचा पोलिसांनी छडा लावला आहे. दोन दिवसात आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या कडून चोरीस गेलेल्या दोन फैशन प्रो मोटर सायकलसह  70 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. 
फिर्यादी विशाल मंचलवार(21) याने 12 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास एस.पी. कॉलेज गेटबाजुला रोडवर फैशन प्रो क्रमांक एम.एच.34 ए डब्ल्यू 9257 ही पार्क करून ठेवली होती. दरम्यानच्या काळात कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची तक्रार शहर पोलिस स्टेशनला तक्रार केली होती. या आधारे पोलिसांनी आरोपी मोहोम्मद रियाज शफीफ शेख(23) रा.नुरी चौक बगड खिडकी याला अटक केली. त्याची चौकशी केली असता आणखी अन्य चोरीच्या गुन्ह्यातील मोटर सायकल आढळून आली. पोलिसांनी चोरीच्या दोन दुचाकीसह 70 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास चेतन गज्जलवार करीत आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post