सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर धाड



*बाबूपेठच्या किराणा दुकानातून सुगंधी तंबाखूच्या साठा जप्त*

चंद्रपूर. जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून प्रतिबंधित अवैध सुगंधित तंबाखू विक्रीचा धंदा सुरू आहे. चंद्रपूर शहरातील अवैध सुगंधित तंबाखू विक्रीवर आळा घालण्यासाठी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने बाबूपेठ येथील सुगंधित तंबाखू विक्रेत्याच्या दुकानावर धाड टाकून एकूण 1 लाख 14 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.34 वर्षीय आरोपी हनुमान आंबटकर हा अनेक वर्षांपासून सुगंधित तंबाखू विक्रीचा व्यवसाय करतो. बाबूपेठ भागात आरोपी हा अनेक लहान व्यवसायिकांना सुगंधित तंबाखू विक्री पुरवठा करण्याचे काम करतो. दरम्यान शहर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच हनुमान आंबटकर यांच्या दुकानात धाड मारत पान मसाला विमल, सुगंधित तंबा,खू शिशा टोबॅको पॉकेट असा एकूण 1 लाख 14 हजार 372 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी 34 वर्षीय हनुमान आंबटकर व त्याची पत्नी मेघा हनुमान आंबटकर यांच्यावर अन्न व सुरक्षा अधिनियम नुसार कारवाई केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनात शरीफ शेख, महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, जयंत चुनारकर, चेतन गज्जलवार, सचिन बोरकर, इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद खान, रुपेश रणदिवे, महिला नायक शिपाई सपना साखरे यांनी केली.
Post a Comment (0)
Previous Post Next Post