चंद्रपूर जिल्हयामध्ये राजेंद्र खांडेकर यांच्या नेतृत्वात शुभेच्छा
पत्र पाठविले
चंद्रपूर:- ऑटोरिक्षा संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यातील २०लाख ऑटोरिक्षा चालकांनी मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना
पोस्टकार्डच्या माध्यमातुन राज्यातील ऑटोरिक्षा चालकाच्यावतीने
पोस्टकार्ड पाठविण्यात आले. ‘चंद्रपूर महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक
असोसिएशन’ तर्फे आज दिनांक ०४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वा.स्थानिकांनी गांधी चौक चंद्रपूर येथे पोस्टकार्ड पाठविण्याचा
कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य महासंघाचे महासचिव राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला चंद्रपूर शहरातील असंख्या पदाधिकारी व ऑटोरिक्षा चालक-मालक उपस्थित होते.राज्यातील २० लाख ऑटोरिक्षा चालकांना कल्याणकारी वेलफेअर बोर्ड मागील सरकारने घोषित केले होते. याची अंमलबजावणी करण्यात यावी, त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे यांनी शपथ विधी घेतल्यानंतर राज्यातील ऑटोरिक्षा चालकांना वेलफेअर बोर्ड त्वरित स्थापित करुन याची अंमलबजावणी करुन व ऑटोरिक्षा चालकांना आणि
त्यांच्या परिवारातील सदस्यांना या योजनेमध्ये लाभ मिळेल, याकरीता प्रयत्न करावे व ठोस आश्वासन देण्यात आले होते. मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे स्वतः ऑटोरिक्षा चालक होते. त्यांचा ऑटोरिक्षा चालक
म्हणून सुरु झालेला प्रवास मुख्यमंत्री पदाच्या दैदिप्यमान
पदापर्यंतजावुन पोहोचला यांचा आम्हा ऑटोरिक्षा चालक-मालकांना अभिमान
आहे. हा कार्यक्रम यशस्वीकरण्यारीता संघटनेचे सचिव सुनिल धंदरे,
उपाध्यक्ष जहिर शेख, संघटन प्रमुख विनोद चन्ने, प्रकाश पात्रा, विलास बावणे, रमेश वझे, जनार्धन गुंजेकर, तुळशिराम वालकोंडावार, विजय मडावी,
सुधाकर उमरे, अंकुश कौरासे, रशिद शेख, संजय मांढरे, लतिफ शेख, खुशाल साखरकर, अशोक नागापुरे, राजु मारशेट्टीवार, रवी आंबटकर यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.
