विनय गौडा चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी



चंद्रपूर:- राज्य शासनाने बुधवारी राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या यात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची नागपूर महानगरपालिके अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागेवर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली असून ते चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अजय गुल्हाने यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागेवर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची नेमणूक करण्यात आली असून गेल्या एक दोन दिवसात ते येथील पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे काही दिवसापूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद अधिकारी म्हणून विवेक जोन्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे आता जिल्हाधिकारीपदी  नव्या दमाच्या अधिकाऱ्याची नेमणूक झाल्याने जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
Post a Comment (0)
Previous Post Next Post