ब्राह्मण शिक्षक संघातर्फे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार



चंद्रपूर : अन्तरराष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधत चंद्रपूर गडचिरोली ब्राह्मण सभेच्या प्रेरकत्वा खाली ब्राह्मण शिक्षक संघ, चंद्रपूर च्या वतीने शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व नामांकित मान्यवरांचा त्याच्या कार्याबद्दल  सत्कार करन्यात आला. पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजिलेल्या ह्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून वणी येथील तिलक महाविद्यालय संस्कृत विभागाध्यक्ष विद्या वाचस्पती,  स्वानन्द पुंड व सुप्रसिद्ध समाज सेविका सौ. नंदिनीताई देवईकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद विधीज्ञ सुनील पुरणकर यानी भूषविले तर शिक्षकांचे प्रातिनिधिक प्रतिनिधि म्हणून धनंजय इंदुरकर हे देखील मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. तर इंदुरकर यानी ज्ञानेश्वरीतील मंगलाचरणातिल ओव्याच्या सस्वर गायनाने करून दिली. त्यानंतर संजय उपाध्ये, शिक्षक, माउंट कार्मेल, घुगुस हयानी प्रास्तविक भाषण सादर केले. सौ. नंदिनी ताईंनी आपल्या छोटेखानी भाषणात  समाजकार्याचा धावता आलेख सादर करून या विषयीची निकड व्यक्त केली. तत्पूर्वी चंद्रपूर नगर क्षेत्रातील मान्यवर निवृत नामांकित प्राध्यापक श्रीयुत निळकंठ कावडकर, श्री सुधाकर ग. पाचपोर, श्रीमती अलका सप्रे, सौ. सीमाताई रूपदे, चंद्रशेखर जोशी व प्रमुख पाहुणे विद्या वाचस्पति डॉ. स्वानन्द पुंड व सौ नंदिनीताई वाईकर ह्याचा श्रीफल, शाल व तुलसीचे रोपटे देवून गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.सत्कारमूर्तिपैकी श्री पाचपोर यानी सर्वांची कृतज्ञता व्यक्त करीत शिक्षकांना सर्वांगीण क्षेत्रांत आपता ठसा उमटवता आला पाहिजे, असे उद्गार काढत कार्यास आशीर्वाद स्वरूप रुपये ५००० ची देणगी दिली. तर कावडकर यांनी हल्लीच्या युगांत वर्तमान शिक्षण पध्दती मुळे शैक्षणीक दर्जाचे अवमूल्यन होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली व तो दर्जा उंचाविण्यास कार्य करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले विद्याव्यासांगी विद्वान विद्या वाचस्पति व डॉ. स्वानन्द पुंड यांनी शिक्षकांनी व ब्राम्हणांनी स्वतःच्या आचरणाकडे विशेष काळजीपूर्वक लक्ष देण्याचे आवाहन करीत स्वतःच्याच दर्जात सुधारणा करावी व आपली प्रतिमा इतरानी आपला आदर राखावा अशी ठेवण्याची विनंती केली.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी असलेले सुनील पुरणकर हयानी हा विषयीची आपली भूमिका मांडत शिक्षक प्राध्यापकांना एकमेकांच्या सहवासात राहून एकजुटीने सहकार्य करत समाजकार्य व शिक्षण कार्य करण्याबाबत विनंती केली.
आभार प्रदर्शन सौ. पूर्वी नि. पुराणिक तर सूत्र संचालक महेश यार्दी यांनी केले. 
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  निखित पुराणिक, संजय उपाध्ये, इंदुरकर, सौ. स्नेहल बाम, कु. सुजाता मोहर व सौ, उपाध्ये यांनी अपार श्रम घेतले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post