असाही एक प्रवास योग प्रेमीचा....



चंद्रपूर :- स्थानिक नवजीवन योग मंडळ, जगन्नाथ बाबा, चंद्रपूर  चे संचालक सचिव, योग शिक्षक, सह प्रभारी भारत स्वाभिमान मधुकर जी राजूरकर ह्यांचा योग मंडळाचे पदाधिकारी, योग साधक, साधिका यांच्या तर्फे तसेच पतंजली परिवार, जिल्हा प्रभारी भगवान जी पालकर, यांच्या हस्ते जिल्हा बैठकी मध्ये भावपूर्ण सत्कार व अभिनंदन  करण्यात आले. निमित्त होते  राजूरकर जी परिवारासोबत बंगलोर येथे आपल्या मुलीला भेटायला गेले. मुलगी ज्या ठिकाणी राहत होती ती एक उच्चभ्रू नागरिकांची वसाहत होती. त्यांनी 13 सप्टेंबर ला तेथे गेल्यानंतर  योग प्रेमी असल्यामुळे तेथील वरिष्ठ नागरिक, विद्यार्थी इतर नागरिक ह्यांच्याशी संपर्क साधून  वसाहती मध्ये योग वर्ग सुरु करण्याची कल्पना मांडली. आजच्या धकाधकी च्या जीवनात शरीराचे आरोग्य सांभाळणे गरजेचं आहॆ , हा दृष्टीकोन लक्षात घेऊन योग वर्ग सुरु करण्याची संमती मिळाली. त्यासाठी क्लब च्या हॉल ची परवानगी मिळवीण्यात येऊन योग वर्ग सुरु करण्यात आला. भाषेची अडचण होती, तेथील भाषा कानडी, इंग्लिश तर राजूरकर जी महाराष्ट्रातील मराठी भाषा वाले. तरी सुध्दा जिद्दीने जमेल तसे इंग्रजी, हिंदी भाषा वापरून आसने,व प्राणायाम अभ्यास सतत 15 दिवस करवून घेतला.
तेथील योग साधकांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले की, राजूरकर सर ह्यांनी घेतलेल्या योगाभ्यासामुळे आमच्या मध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली आहॆ, आत्मविश्वास वाढला आहॆ. आणि ते येथून गेल्यानंतर सुध्दा योग वर्ग असाच सुरु राहील असे निवेदीत केले.
राजूरकर सर ह्यांनी सुध्दा सर्वांनी सहकार्य दिल्या बद्दल सर्वांचे,व डाँ अहिरकर ह्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
एक कौतुकास्पद कार्य राजूरकर जी ह्यांनी केले याबद्दल पतंजली योग परिवार त्यांचे अभिनंदन करीत आहे
Post a Comment (0)
Previous Post Next Post