चंद्रपूर :- गडचांदुर येथील निवासी पंडित काळे यांना नेल्सन मंडेला ब्रिलेन्स ग्लोबल पुरस्कार नुकताच इंदोर येथी पंचतारांकित हॉटेल वॉव येथे सिने अभिनेता रमेश गोयल, लेफ्टनंट जनरल सिसोदिया, सुनील सोनी, चौरसिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पंडित काळे यांनी आपल्या जीवन कार्याची सुरूवात अंबुजा सिमेंट कंपनीतून एक कॉट्रॅक्टर या नात्याने सुरू केली. कार्यातील गुणवत्ता व सातत्याच्या बळावर आजच्या घडीला त्यांचे कॉन्ट्रॅक्ट पाच कंपनीशी सुरू आहे. याशिवाय त्यांच्या या कार्यातून जवळपास 1800 कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. उद्योग जगतातील त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शून्यातून विश्व निर्माण करत काळे यांनी समाजपुढे आदर्श निर्माण केला. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
