चंद्रपूर:- चंद्रपुर जिल्हातील व्यवसाय शिक्षणात तसेच नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली संस्था, श्री. साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथील पन्नास प्रशिक्षणार्थी आणि निदेशक यांनी मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि मा. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर शहरातील सामाजीक संस्था “ईको-प्रो” यांच्या वतीने आयोजित "श्रमदाना" चा कार्यक्रम शनिवारला सकाळी ७.३० वाजता पठाणपुरा गेट चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता. हया श्रमदानाच्या कार्यक्रमाकरिता संस्थेकडुन विजतंत्री व्यवसायाचे पन्नास प्रशिक्षणार्थी पाठविण्यात आलेत त्यांचे सोबत संस्थेचे गटनिदेशक, संजय बाकरे, तसेच निदेशक, . प्रविण लांजेवार, विनोद गोवारदिपे आणि चंद्रशेखर कुचनकर यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन श्रमदानाकरिता योगदान दिले. त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेच्या मा. अध्यक्षा, श्रीमती विद्या येरगुडे मॅडम, मा. सचिव अमित येरगुडे सर तसेच मा. उपाध्यक्ष श्री. अभिषेक येरगुडे सर आणि प्राचार्य राजेश पेशट्टीवार यांनी कौतुक करूण असेच सामाजिक कार्यामध्ये भाग घेण्याकरीता प्रोत्साहन दिले आणि प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन केले.
