चंद्रपूर:- शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बल्लारपूर, जि. चंद्रपूर येथे आज दिनांक १७ सप्टेंबर २०१२ रोजी दिक्षांत संभारंभाचे आयोजन करण्यात आले.संभारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणुन गोविंद श्रीराम पवार मोटार वाहन निरीक्षण, चंद्रपूर तसेच विद्याताई देवाडकर सदस्या, ग्रामपंचायत विसापुर या उपस्थित होत्या अध्यक्षस्थानी
संस्थेने प्राचार्य, भालचंद्र रासेकर उपस्थित होते. पवार यांनी शिक्षणाचे तसेच दिक्षांत सभारंभाचे विस्तृत विश्लेषन करीत कौशल्य शिक्षणाचे महत्व विशद केले.आपल्या अष्टपैलू व्यक्तिमव्याची साक्ष देत संघर्ष व कष्ट केल्यानंतरच यश प्राप्त होते तसेच अपयशाने खचुन न जाता नव्या आशेने परिश्रम करून यशस्वी होता येते अशा प्रकारचे मार्गदर्शन करून आयुष्याच्या विविध पैलूंवर संबोधन करीत "आई" वर सुमधूर गीत गात सवचि मन सौ. विद्याताई देवाडकर यांनी जिंकले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विजतंत्री, जोडारी, ईलेक्ट्रॉनिक्स मेक्यानिक, कोपा, व स्युइंग टेक्नॉलाजी या व्यवसायातील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यानां पालकांसह संस्थेच्या वतीने स्मृतीचीन्ह व प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले.सदर दिक्षांत कार्यक्रमाचे कु. गायत्री जावरकर यांनी सुत्रसंचलन केले कार्यक्रमाचे आभार दिवाकर भाकरे प्रभारी गटनिदेशक यांनी मानले व राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री व्हि आर पाहुणे, कु मेघा तोडसाम, कु सुषमा निब्रड, सौ. संध्या कळसकर, रत्नाकर खोब्रागडे, रवि ढोक, अमोल पाटील, विकास जयपुरकर, सचिन उमरे, मधुकर मुसळे, मनिष माहुरपवार, कु. आर. बी. भुक्या. भगवान खांडेकर, व सौ. सविता ईटनकर तसेच भारत सोयाम यांनी परीश्रम घेतले.
