चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राहुल पावडे यांचा वाढदिवस विविध सेवाकार्याच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राहुल पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा नाका येथे दर्ग्यावर चादर चढवून गोरगरिबांना ब्लॅंकेटचे वितरण भाजपा शहर सचिव चांद सय्यद यांच्या वतीने कार्यक्रम घेवून करण्यात आले. तसेच राहुल पावडे मित्र परिवारातर्फे त्यांच्या राहत्या घरी असंख्य कार्यकर्त्यांसह केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यासह विविध कार्यक्रम सुद्धा शहरात घेण्यात आले.
राहुल पावडे हे युवकांसाठी प्रेरणास्थान असून त्यांना मोठ्या प्रमाणात मानणारा युवावर्ग आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्ती म्हणून सुद्धा चंद्रपुरात आज त्यांची ओळख आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये सतत पाच वर्षे पदावर राहून शहराचा चेहरा मोहरा बदलन्याध्ये त्यांचे सुद्धा सिंहाचा हातभार लागलेला आहे.
राहुल पावडे मित्र परिवारातर्फे सुद्धा विविध कार्यक्रम घेण्यात आले होते.यावेळी राहूल पावडे मित्र मंडळ यांच्या कडून फळ वाटप करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे सचिव चांद भैया सय्यद तसेच मुस्लिम मित्र मंडला तर्फे वरोरा नाका येथील दर्ग्यात चादर चढवून दिर्घायुष्याची प्रार्थना केली. अथर्व कॉलनी येथील अथर्व गणेश मंडळ तर्फे आरती तसेच बक्षीस वितरण आणि जेष्ठ नागरिकांच्या सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठक्कर कॉलनी येथील वक्रतुंड गणेश मंडळातर्फे आरतीचे आयोजन तसेच भव्य सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता. नगीनाबाग व्यायाम प्रसारक मंडला तर्फे माजी नगरसेवक प्रशांत चौधरी यांच्या माध्यमातून महापूजा तसेच आरतीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. जटपुरा गेट येथील अष्टविनायक गणेश मंडळ तर्फे अभि वांढरे यांच्या माध्यमातून श्रीगणेशाची आरती तसेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. कॉलनी येथील मित्र मंडळ तर्फे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. शेंडे लेआऊट येथील मित्र मंडळ तर्फे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. शिव मंदिर श्याम नगर वार्ड येथील मित्र मंडळ तर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला. सत्यम गाणार मित्र परिवारातर्फे वाढदवसानिमित्त केक कापून साजरा करण्यात आला. हिवरपुरी बाल गणेश मंडळ विठ्ठल मंदिर वॉर्ड तर्फे श्याम बोबडे आणि मित्र मंडळ तर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला



