अखेर चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धावले कॅन्सर ग्रस्तांच्या मदतीला*


 
सावली:-  सावली तालुक्यातील पारडी येथील कॅन्सर आजाराने त्रस्त असलेल्या श्री भानुदासजी नरुले  यांना  विजयभाऊ वडेट्टीवार साहेब माजी  पालकमंत्री तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र यांच्याकडून आर्थिक मदत करून एक आधार दिला आहे.यावेळी उपस्थित  नितीनजी गोहणे तालुकाध्यक्ष,  बंडू मेश्राम सरपंच रवि पाटील गेडेकर अध्यक्ष तंटा मुक्त समिती,  अमोल भोयर अध्यक्ष ग्राम काँग्रेस कमिटी, ओमप्रकाश पोटे सोशल मिडिया सेल, आनंदराव गोहणे सदस्य, कृष्णनाथ चरडुके,  सुनील पाल उपसरपंच उसेगाव, दिलीप लटारे लोंढोली, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. 
विजयभाऊ हे चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय माजी पालकमंत्री असून त्यांनी अनेकांना आधार दिलेला आहे. पारडी येथील भानुदास नरुले यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्यांनी कॅन्सर या रोगाशी सामना करत आहे. ही बातमी गावच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी  सावली  काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष श्री नितिन जी गोहणे यांच्याशी चर्चा करून हा विषय विजयभाऊ च्या लक्ष्यात आणुन दिले. भाऊ ने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ मदतीचे आश्वासन देऊन ही आर्थिक मदत संपूर्ण कांग्रेस चे पदाधिकारी जाऊन मदत पोहचवून दिले.विजयभाऊ हे गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जातात. अश्यातच त्यांनी एक गरीब व्यक्तीला आधार दिले. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत गरीब जनतेची सेवा करण्याचे वचन दिले आहे..
Post a Comment (0)
Previous Post Next Post