राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघ द्वारा आयोजित ओबीसी किसान संमेलन अमरावती येथे संपन्न
अमरावती : - विदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात. या आत्महत्येस निसर्गासह शासनाची ध्येय धोरणे जवाबदार आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या याकरीता राज्य शासनाने ध्येय धोरण बनवावे असे उद्गार विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी काढले. निमित्त होते ओबीसी किसान संमेलनाचे.राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघ द्वारा स्थानिक वलगाव रोड येथील श्री क्षेत्र चांगापुर देवस्थान येथे ओबीसी किसान संमेलन आज (दि.२७) ला पार पडले.यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे, राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश साबळे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरददादा तसरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. श्याम गभणे, राष्ट्रीय सहसचिव शरद वानखेडे, युवा आघाडी चे सुभाष घाटे, महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा कल्पना मानकर, राजू चौधरी, आदी उपस्थित होते.
यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी शेतकरी बांधव उपस्थित होते.

