केंद्र सरकारचा केला निषेध



शिवसैनिक आक्रमक

चंद्रपूर :- शिवसेनेत उद्धव ठाकरे व शिंदे गट अशी उभी फूट पडल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच खासदार संजय राऊत यांच्या घरावर रविवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धाड टाकली. त्यांना ताब्यात घेवून चौकशी केल्यावर संजय राऊत यांना आज सोमवारी अटक करण्यात आली. या घटनेचे पडसाद चंद्रपुरातही उमटले. शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत आज सोमवारी स्थानिक जटपुरा गेट येथे केंद्र सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन करत निषेध करण्यात आला. 
केंद्र सरकारने ईडी, इन्कम टॅक्स अशा शासकीय यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना घाबरवत असून अटक सत्र सुरू केले आहे, ही लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने हा डाव आखला असल्याची टिका यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गि-हे यांनी केली. 
यावेळी शिवसेना जिल्हामुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात व महानगरप्रमुख प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितित चंद्रपूर शिवसेनेतर्फ़े जेटपूरा गेट येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात शिवसेना नेते नगरसेवक सुरेश पचारे, बबन उरकुडे, नंदू पडार, स्वप्निल काशीकर, निलेश बेलखेडे, वसीम भैया, समीर कुरेशी, राहुल विरुटकर, बाळू भगत, राकेश घटे, युवासेना ज़िल्हा समन्वयक विक्रांत सहारे, ज़िल्हा चिटणीस विनय धोबे, गिरीश कटरे, सुमित अग्रवाल, हर्षद कानपाल्लीवर, सूजीत पेंदोर, प्रकाश चंदनखेडे, वसीम शेख, प्रफुल चावरे, सोनू ठाकूर, आदित्य वेले, राज पाचबाई, नागजी गंडफडे, करण वैरागडे, वैभव काळे, शिवा वजारकर, प्रशांत गाटूरवार, सोनू चावरे, महिला आघाडी उज्ज्वला नलगे, कुसुम उदार, वर्षा कोटेकर, विद्या ठाकरे, रोहिणी पाटील, धनश्री हेडाऊ आदींसह सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post