ओबीसीचा मुद्दा संपूर्ण देशभरात घेऊन जाणार : उमेश कोराम



 बल्लारपुरात मंडल यात्रेचे स्वागत

बल्लारपूर :- संपूर्ण देशभरातील ओबीसींचे संघटन बनवून जातीनिहाय जनगणना हा संवैधानिक हक्क मिळविण्याकरीता आम्ही सर्वोतपरी प्रयत्न करून ते करूनच दाखवू, असे प्रतिपादन मंडल यात्रेचे आयोजक उमेश कोराम यांनी बल्लारपूर येथे मंडल यात्रेच्या आगमना प्रसंगी केले.
7 ऑगस्ट 1990 ला मंडल आयोग लागु करण्यात आले. त्यानिमित्ताने ही मंडल यात्रा 1 ऑगस्ट पासून नागपूर येथून सुरू करण्यात आली. यावेळी एकूण 7 जिल्ह्यातील प्रवासादरम्यान गुरुवारी बल्लारपूर येथे त्याचे आगमन झाले. तत्पूर्वी कारवा रोड ते बल्लारपूर नगरपालिका चौक पर्यंत मोटारसायकल द्वारे फेरी काढण्यात आली होती. त्यानंतर नगरपरिषदच्या बचत भवन समोरील प्रांगणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी मंचावर सेल्फ रिस्पेक्ट मोमेंटचे बळीराम धोटे, डॉ. रजनी हजारे, अँड. अंजली साळवे - इटनकर, संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे, अनिल डहाके, डॉ. राकेश गावतुरे, डॉ. समीर कदम, दिनेश पारखी उपस्थित होते. प्रस्ताविक मनोहर माडेकर यांनी केले. संचालन चेतन गेडाम व आभार डॉ. राकेश गावतुरे यांनी केले. या प्रसंगी ओबीसी समन्वय समितीचे सदस्य व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post