अखेर चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी धावले आजारी असलेल्या व्यक्तीच्या मदतीला



 सावली:-  तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या ओमप्रकाश कुडावले, वय ६२ वर्षे यांना विजय वडेट्टीवार साहेब माजी इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनवर्सन तथा माजी पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांनी आर्थिक मदत करून एक आधार दिला आहे. 
यावेळी उपस्थित  नितीन गोहणे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी सावली लताताई लाकडे नगराध्यक्षा नगर पंचायत सावली, मोतीलालजी दुधे संपर्क कार्यालय प्रमुख काँग्रेस कार्यालय सावली, सौ भावना बिके उपसरपंच ग्राम पंचायत व्याहाड खुर्द, श्री मनोज बिके  व संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय माजी पालकमंत्री असून त्यांनी अनेकांना आधार दिलेला आहे.  व्याहाड येथील  ओमप्रकाश कुडावले यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्यांना किडनीचाआजार जडलेला आहे. तसेच ते दिव्यांग असून सध्या सावंगी मेघे येथे उपचार घेत आहेत.ही बातमी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी  सावली  काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष  यांच्याशी चर्चा करून हा विषय विजय वडेट्टीवार च्या लक्ष्यात आणुन दिले. श्री भाऊ ने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ मदतीचे आश्वासन देऊन काही दिवसांतच ही आर्थिक मदत संपूर्ण कांग्रेस चे पदाधिकारी जाऊन मदत पोहचवून दिले.
 विजय वडेट्टीवार हे गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जातात. अश्यातच त्यांनी आर्थिक मदत देऊन त्यांना आधार दिले. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत गरीब जनतेची सेवा करण्याचे वचन दिले आहे
Post a Comment (0)
Previous Post Next Post