राहुल पावडेंच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात सफाई*रोगराई पसरू नये म्हणून ब्लिचिंग पावडर, फवारणीला प्राधान्य



चंद्रपूर : शहरातील नगिना बाग प्रभागातील सिस्टर कॉलनी, स्वावलंबीनगर, साईनगरी, रहेमतनगर या परिसराला पुराचा मोठा फटका बसला आहे. पूर ओसरल्यानंतर दुर्गंधीमुळे या भागात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पूरग्रस्त भागांत सफाईच्या कामात स्वताला झोकून दिले आहे. ब्लिचिंग पावडर, फवारणी आदी कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत.मागील आठवड्यापासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागली. त्यात इरई व अन्य धरणांचे दरवाजे उघडल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील नगिनाबाग प्रभागातील सिस्टर कॉलनी, स्वावलंबीनगर, साईनगरी, रहेमतनगर वाघमारे लेआउट उमाटे लेआउट भवानी नगर ठक्कर कॉलनी महसूल कॉलनी या परिसराला पूरामुळे घर बुडालेल्या लोकांची राहण्याची व्यवस्था अग्रेसन भवन, जेष्ठ नागरिक संघ या ठिकाणी त्यांच्या व्यवस्था करण्यात आली. त्यासोबतच कुणीही उपाशी राहू नये, असे लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी निर्देश दिले होते. या निर्देशाचे तंतोतंत पालन करत राहुल पावडे व त्यांच्या मित्र मंडळींनी गरजु लोकांकरीता जेवणाची व चहा व्यवस्था केली या नैसर्गिक आपत्तीत माजी उपमहापौर राहुल पावडे भाजपाचे सचिव चांद सय्यद व कार्यकर्त्यांसह पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत. पूरग्रस्तांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. तसेच पूर ओसरल्यानंतर त्या परिसरातील स्वच्छतेसाठी घरोघरी ब्लिचिंग उपमहापौर राहुल पावडे यांच्या वतीने पावडरचे वाटप केले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post