त्या दारु दुकानाबाबत वाटली रसद ?


उत्पादन शुल्क विभागाचा भोंगळ कारभार

सत्तांरणानंतर या प्रकराणात कार्यवाही होणार*?
 
 चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्याची दारू सुरू होताच शहरासह जिल्ह्यात शेकडो दारुची दुकाने वाटल्या गेली. काही जुने परवाने नुतनीकरण करून तर काही नवीन परवाने दिले जात गेले मात्र, एका देशी दारु दुकानाच्या प्रकरणात परवाना देतांना जुन्याच व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करता सदर दुकानाला अनुज्ञाप्ती दिली गेली. यासंदर्भात एका कार्यकर्त्याने माहिती विचारून हा विषय उचलून धरताच लाखो रुपयांची रसद देवून ? त्याला गप्प बसविल्या गेल्याची चर्चा सध्या कार्यालयीन वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने असे किती परवाने आर्थिक व्यवहारातून वाटले असावे, याचा अंदाज व्यक्त करणेच कठिण आहे.
दुकानाचे जुने लायसन्स हे नव्याने सुरू केले असता त्यामध्ये काही कागदोपत्री तफावत आढळून येत आहे, यासंदर्भात अनेकवेळा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक  यांच्याकडे विचारणा केली. परंतु, चार दिवसांत कारवाई करू, आठ दिवसांत माहिती घेवून सांगतो..अशीच उत्तरे मिळाली. जवळपास महिनाभराहून अधिक काळ लोटला. परंतु, अधीक्षक महोदय काही सांगण्यास तयार नाही. अशातच आता शहरातील एका माजी नगरसेवकाने देखील दारु दुकानाचे परवाने मंजुरी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला. त्यामुळे एकूणच या विभागाच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे अनेक दारु दुकानांना नियमात बसत नसतांना परवाने चक्क वाटले गेले असल्याचे बोलल्या जात असून राज्यातील सत्तांतरणानंतर जिल्ह्याचे नेतृत्व करणा-या बड्या नेत्यांकडेही याबाबत तक्रार गेली असल्याची चर्चा.त्यामुळे या कथीत गैरव्यवहारातील संबंधित अधिकारी व कर्मचा-यांवर लवकरच कार्यवाही होणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post