विद्युत शॉकने ६० वर्षीय इसमाचा मृत्यू



चंद्रपूर :- दुर्गापूर परिसरातील मेजर गेट येथील एका नवीन इमारतीच्या बांधकामवर देखरेखे करिता चौकीदार म्हणून काम करीत असलेल्या (६०)वर्षीय इसमाचा विद्युत शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली मारुती दयाड मुरमाडे राहणार मुढोली तालुका चामोशी जिल्हा गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे नवीन इमारतीच्या बांधकामाचा बेसमेंट मध्ये पाणी साचले असता ते पाणी साफ करीत असताना त्यांना विजेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला सदर नवीन इमारतीचे बांधकाम हे स्मिता प्रशांत खनके यांचे आहे तरी याबाबत खनके यांच्यावर हलगर्जीपणाचा पोलिसांनी याबाबत मर्ग दाखल करून पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे
Post a Comment (0)
Previous Post Next Post