चंद्रपूर :- गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यासह जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. दरम्यान चंद्रपूर शहरातील वडगाव व हवेली गार्डन परिसरातही मोठ्या प्रमाणात सदर परिसर जलमय झाला. दरम्यान या प्रभागातील नागरिकांसाठी धावून जात माजी महापौर राहुल पावडे यांनी मदतीचा हात दिला. हवेली गार्डन परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून नागरिक पाण्यात अडकून पडले होते. अशावेळी मनपा अधिका-यांना आवश्यक सूचना देत राहुल पावडे वडगाव प्रभागात सक्रिय होते. आपल्या कार्यकर्त्यांच्या चमूसह त्यांनी यावेळी नागरिकांना मदत केली व जिथे कुठे मदतीची गरज असल्यास संपर्क करावा, आम्ही तिथे मदतीसाठी तत्पर राहू, असे त्यांनी सांगितले. कार्यालयात संपर्क साधणा-या नागरिकांकरीता अजुनही मदतीचा हात दिला जात असून जनतेच्या सेवेसाठी राहुल पावडे अहोरात्र कार्यतत्परतेने काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
