पूर पीडितांना सुरक्षित स्थळी हलविण्यात बाबत प्रशासन व कार्यकर्त्यांना सूचना
चंद्रपूर:- चंद्रपूर मागील आठवड्यात पासून सर्वत्र पाऊसाची संततधार असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे शहर लगत असलेले इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले आहे तसेच गोसीखुर्दचे सुद्धा पाणी सोडण्यात आले त्यामुळे शहरातील नदीकाठी असलेल्या भागांमध्ये रहेमत नगर सिस्टर कॉलनी हवेली गार्डन निरज कॉलनी उमाटे लेआउट टक्कर कॉलनी या भागात जागोजागी पाणी साचल्याने आज बुधवारी सकाळपासूनच माजी उपमहापौर राहुल पावडे व कार्यकर्त्यांनी या परिसराची पाहणी केली तसेच तेथील नागरिकांच्या भेट घेऊन त्यांना काही अडचण असल्यास संपर्क कार्यालयात सांगावे व त्यांची व्यवस्थाच्या दृष्टीने विचारपूस करून त्यांना योग्य ते व्यवस्था पुरवली जाईल असे आश्वासन दिले

