विज्ञान शाखेचा निकाल ९९.७४%; कला शाखेचा निकाल ९५% ; वाणिज्य शाखेचा निकाल ९५.७८% तर एम.सी.व्हि.सी. शाखेचा निकाल ९५.८३%
चंद्रपूर :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीचा सत्र २०२१-२२ चा निकाल आज (दि. ८) ला जाहीर झाला. यानुसार याही वर्षी जनता कनिष्ठ महाविद्यालयाने यशाचा इतिहास अबाधित ठेवला आहे.
जनता कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९९.७४% टक्के, कला शाखेचा निकाल ९५% ; वाणिज्य शाखेचा निकाल ९५.७८% तर एम.सी.व्हि.सी. शाखेचा निकाल ९५.८३% इतका लागलेला आहे.
महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून राज खनके (९३.३३%), कु. रिया मांढरे (९३.३३%), अमेय भलमे (९२.३३%), कु. डोलीया मानकनी (९२.३३%), अजय सोनी (९२.१७%), शिव पोटकर (९०.५०%), अथर्व वासाडे (९०.१७%), प्रतीक्षा बिसने (९०%), रीद्दी रंगारी, जानवी ठीकरे, ओमकार हेपट, हरमनदीप कौर, संजू गुप्ता, चैताली हगे, खुशी निखार, अबोली पराते, शंतनू धाडगें, शुभम नीकुरे, श्रावणी नमुलवार, रेणुका देशपांडे, सोहम झाडे, श्रेयस गाढे, सावी पेंदोरकर, आयुष सिंग, दिया नागुलवार हे विद्यार्थी प्राविण्याप्राप्त आहेत.
कला शाखेतून विनीत पिदुरकर (७८%), कु. निकिता घोडके (६६.३३%), कु. सुप्रिया पाचाभाई (६६.३३%), वाणिज्य शाखेतून यश पुराणिक (८९.५०%), कस्तुरी जिराफे (८४.१७%), प्राची मुके (८४%), एम.सी.व्ही.सी. शाखेतून महेश मुमडवार (६४%), समीर सीडाम (६२.८३%) हे विद्यार्थी प्रावीण्यप्राप्त झालेले आहेत.
प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई जिवतोडे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जिवतोडे, महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष, उपप्राचार्य सौ. के.ए. रंगारी, प्रा. लीलाधर खंगार, प्रा. नितीन कुकडे, डॉ. के.सी.पाटिल, प्रा. व्ही.एस.बोढाले, डॉ. ए.के.महातळे, डॉ. माया धमगाये, प्रा. विद्या शिंदे, प्रा. डी.बी. हेपट, प्रा. संजय पवार, प्रा. जी. बी. दरवी, प्रा. शरद कुत्तरमारे, प्रा. रविकांत वरारकर, प्रा. प्रविण चटप, प्रा. महेश यार्दी तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
