अधिकाऱ्यांच्या निर्देशाला केराची टोपली



आम आदमी पक्षाचे मुख्याधिकाऱ्यांना साकडे

बल्लारपूर :- बल्लारपूर मागील आठवड्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाची सभा झाली. त्यामध्ये पावसाळ्यापूर्वी शहरातील अत्यावश्यक कामे करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या. पावसाळा दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु, नगर परिषदेने नालेसफाईचे काम सुरू केले नाही. त्यामुळे एकप्रकारे अधिका-यांच्या आदेशाला केराची टोपलीच दाखविली आहे.  त्यामुळे आम आदमी पक्षातर्फे नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना ही समस्या तातडीने सोडविण्याचे साकडे घातले आहे.पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. मात्र, आतापर्यंत तीन प्रभागांतील नाल्यांची सफाई न केल्याने शहरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी नाले सफाई न झाल्यास पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांच्या घरात घाण पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही समस्या त्वरित सोडविण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.यावेळी शहर उपाध्यक्ष सय्यद अफजल अली, सचिव ज्योती बाबरे, महिला संघटन मंत्री किरण खन्ना, सरिता गुजर, सहसचिव शीतल झाडे, कोषाध्यक्ष आसिफ हुसेन शेख, किसान आघाडी प्रमुख सुधाकर गेडाम, सागर कांबडे, समशेरसिंह चव्हाण, रिना बहुरिया, शारदा बहुरिया आदी उपस्थित होते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post