वाघाच्या हल्लयात आवळगाव वनपरिक्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक बचावले



ब्रम्हपूरी:- तालुक्यातील एकारा मुरझा या परिसरात वाघाचे मोठया प्रमाणात वास्तव्य आहे त्यामुळे दिवसाढवळया नागरीकांना वाघाचे दर्शन होत असते. आवळगाव गावाजवळून जाणार्‍या कालव्याच्या पुलाखाली काल दुपारच्या सुमारास 1 अचानक वाघ नागरीकांना दिसला त्यानंतर वाघाच्या दर्शनासाठी परिसरतील नागरीकांनी गर्दी केली. वनाधिकार्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता जमलेल्या नागरीकांना तिथून दुर करीत असतांना नहराच्या पाळीवर असलेले क्षेत्रसहाय्यक करंडे यांच्या दिशेने वाघाने झेप घेतली असता बाजूच्या असलेल्या दुचाकीला ढकलून ते थोडक्यात बचावले. लगेच वाघाने तिथून पळ काढला सदर वाघ वृध्द असून तो जखमी असल्याचे समजते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post