इच्छुक उम्मेदवारांना अर्ज वाटप
बल्लारपूर :- बल्लारपूर नगरपरिषदेचे प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले असून, बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय देवळीकर, उपविभागीय अधिकारी दीप्ति पाटील सूर्यवंशी, उप मुख्याधिकारी जयवंत काटकर यांनी राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या समक्ष प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. यानंतर आता बल्लारपूर येथे विविध राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
तसेच राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांसाठी कार्यालयातुन अर्ज वाटप सुरू केले आहे. बल्लारपूर नगरपरिषदेत पूर्वी 16 प्रभाग होते. आता 17 प्रभाग झाले आहेत. 17 प्रभागामधून 34 नगरसेवक निवडले जाणार आहे. नगर परिषदेच्या एकूण 34 जागापैकी 17 महिला आरक्षीत जागेत अनुसूचित जाती 5, अनुसूचित जमाती 1 व सर्वसाधारण महिला 11 जागा आरक्षीत करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित 17 मध्ये अनुसूचित जाती 5, अनुसूचित जमाती 1 व सर्वसाधारण 11 जागा आलेल्या आहेत.
दरम्यान भारतीय जनता पार्टी तर्फे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयातुन 14 जून पासुन प्राप्त करूण पूर्ण भरलेला अर्ज पार्टी जनसंपर्क कार्यालयात जमा करावा, असे आवाहन भाजप शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह, भाजप शहर महामंत्री मनिष पांडे यानी केले आहे.
