शहरवासीयाचा जीवाशी खेळताहेत शितलजल विक्रेते



लग्नसराईच्या दिवसात शितल जल कॅन विक्रेत्यांची नफेखोरी

चंद्रपूर :- शहरात शूद्ध शितलजलच्या नावाखाली अशुद्ध पाणी सर्रास विक्री होत असून त्यामुळे शहरवासीयांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे. चंद्रपूर शहरात शितल शुद्ध पाण्याच्या नावाखाली बोंरीगचे पाणी टँकमध्ये साठवून त्याला थंड केल्या जाते. त्यानंतर याच अशुद्ध पाण्याची सर्रास विक्री केल्या जात आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असून थंड पाण्याची कॅनला मोठी मागणी आहे. परंतु, अशुद्ध पाणी विक्री केल्या जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या विक्रेत्यांवर स्थानीक प्रशासन डोळेझाक करित असल्याने शहरवासीयांचा जीवीताला धोका निर्माण झाला आहे. शितल शुद्ध जल निर्मात्याची कोणतीच नोंद सुद्धा प्रशासनाकडे आहे काय? असा प्रश्न येथील जनता विचारत आहे. शूद्ध जल खरच शूद्ध आहे की, अशूद्ध हे तपासणे तर वेगळेच राहिले. अशा या विक्रेत्यांवर कार्यवाही कोण करेल, हा खरा प्रश्न पुढे येत आहे. शहराची व्यवस्था इतकी कशी काय कोलमडली की आता शहरवासीयांचा जीवीताशी खेळ सूरु असताना स्थानिक प्रशासन बघ्याची भुमिका घेत आहे.लग्नसराई सध्या सूरु असुन याचाच फायदा हे विक्रेते जास्त पैशाचा हव्यासापोटी घेत आहे. आता तरी ढीम्म प्रशासन जागे होऊन या अशुद्ध पाणी विक्रेत्यांवर कार्यवाही करणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या विक्रेत्यांचे शहरात 300 ते 400 च्या वर प्रक्रीया केंद्र असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. याकडे आता त्वरीत जिल्हा प्रशासनाने लक्ष्य देऊन कठोर कारवाई विक्रेते व संबधीत अधिका-यांवर करण्याची मागणी शहरवासीयानी केली. जिल्हा प्रशासनाने तडक-फडकी कार्यवाही नाही केली तर फार मोठा अनर्थ होण्यास कोण जबाबदार राहील, हा विषय चींतेची बाब ठरत आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post