शरीर व मनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी योग करा :- माजी उपमहापौर राहुल पावडे


चंद्रपूर :- स्थानिक नवजीवन योग मंडळ, जगन्नाथ बाबा नगर, चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना राहुल पावडे, माजी उपमहापौर, चंद्रपूर महानगर पालिका, यांनी योग साधकांशी संवाद साधताना म्हटले  की सध्याच्या प्रदूषण काळात आपल्या शरीराचे व मनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी नियमित योग प्राणायाम सर्वांनी केले पाहिजे असे आवाहन केले.निमत्त होते


 नवजीवन योग मंडळाचे संचालक व योग शिक्षक मधुकर राजूरकर व त्यांची सुविदय पत्नी सौ. प्रार्थना राजूरकर ह्यांच्या  लग्नाच्या 30 व्या वाढदिवसाचे.वरील वाढदिवसानिमित्त एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यामध्ये  विजय चंदावार, जिल्हा प्रभारी, भारत स्वाभिमान शरद व्यास, जिल्हा संघटन मंत्री, पतंजली योग समिती, कासनगोट्टूवार, माजी नगर सेवक,  ददगाल, उप जिल्हा प्रभारी, भारत स्वाभिमान हे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व प्रमुख वक्त्यांनी नवजीवन योग मंडळाने स्थापने पासून गेल्या दहा महिन्यात लोकांच्या स्वास्थ्य रक्षणासाठी साठी नियमितपणे योग केंद्र चालवीत आहॆ  त्याबद्दल प्रसंशा केली. तसेच केंद्राच्या पुढील प्रगतीसाठी बहुमोल मार्गदर्शन केले.या प्रसंगी मधुकर राजूरकर व त्यांची पत्नी सौ. प्रार्थना राजूरकर ह्यांना पाहुण्यांनी व उपस्थित साधकांनी शुभेच्छा दिल्या. मधुकर राजूरकर, संचालक ह्यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की उपस्थित मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मंडळातर्फे योग विज्ञान उपक्रम राबवीण्यासाठी प्रयत्नशील राहील.वरील  कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन श्री. भालचंद्र डहाके ह्यांनी केले.या प्रसंगी उपस्थित बहुसंख्य योग साधक व साधीकांनी मान्यवरांच्या बहुमोल मार्गदर्शनाचा व अल्पउपहाराचा लाभ घेतला.
Post a Comment (0)
Previous Post Next Post