गडचिरोली :- नुकत्याच चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या फुले शाहु आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनात आपल्या जिल्ह्यातील विविध सौंदर्य स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या माधुरी जगदीश मडावी यांना फिनिक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी विचार पिठावर संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अरुणा सबाने , स्वागताध्यक्ष डॉ. अड.अंजली साळवे, डॉ.लक्ष्मण यादव, प्राचार्य संध्या राजुरकर , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, राहुल खांडेकर जगदीश मडावी, प्रा. नामदेव मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.मनिषा मडावी ह्या गडचिरोली येथील नक्षलप्रभावित, अतिदुर्गम भागातील असून त्यांनी अनेक अडचणींना तोंड देत , विषम परिस्थितीवर मात करत मिसेस इंडिया विनर, मिसेस महाराष्ट्र, टीव्ही रिऍलिटी शो विनर तसेच वेगवेगळ्या सौन्दर्य स्पर्धेत जिल्हाचे नाव देशपातळीवर उंचवल्याबद्दल मनीषा मडावी यांना राज्य स्तरीय फिनिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. परीचय वाचन आणि सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवयित्री सौ. प्रिती झगझाप यांनी केले.
