चंद्रपूर :- *औद्योगिक जिल्हा असल्याने आज जिल्ह्याचा झपाट्याने विकास व विस्तार होत आहे. अनेक उद्योग, कारखाने सुरू झाल्यानंतर रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे डॉक्टरांचा व्यवसायही जोरात सुरू आहे. मात्र, अनेक रुग्णालयांकडे रुग्णांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था नसल्याने लोक रस्त्यावरच वाहने उभी करून देतात. यामुळे इतरांना मात्र, त्रास सहन करावा लागत आहे.ज्या वेगाने जिल्ह्याचा विकास होत आहे, त्याच धर्तीवर अनेक मल्टीस्पेशालिटी आणि इतर खासगी रुग्णालये तयार करण्यात आली आहेत. जिथे डॉक्टर रुग्णांवर उपचार करतात. मात्र येणाऱ्या रुग्णांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय नसल्याने रुग्णांचे नातेवाईक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. मात्र महानगर पालिकेने आजपर्यंत याकडे दुर्लक्ष केलेले आहे.*
