चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा तापमानात उच्चांक गाठत आहे, ग्रामीण भागातील नागरिक रात्री घराबाहेर अंगणात झोपत असतात, मात्र अंगणात झोपणे या उन्हाळ्यात कठीण झाले आहे,सिंदेवाही तालुक्यातील सरडपार (चक) येथे रात्री अंगणात झोपलेल्या 70 वर्षीय माणिक बुद्धा नन्नावरे यांच्या जीवावर बेतले. माणिक यांचेवर रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवीत ठार केले.सदर घटनेने सरडपार येथे चांगलीच दहशत पसरली असून लवकरात लवकर वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.तशीच दुसरी घटना पण सिंदेवाही तालुक्यातील पवनपार बिटातसकाळी 7वाजता घडली असून सुरेश लोनबले वय 50 याला पट्टेदार वाघाने ठार केले,
सध्या ग्रामीण भागात मोह फुले जमा करण्याचा कार्य सुरू आहे,उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचे रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागात सध्या मोह फुले जमा करून उदरनिर्वाह केल्या जात आहे, त्यामुळेच ग्रामस्थ पहाटे लवकर जंगलात जाऊन मोह फुले जमा करतात,नेहमी प्रमाणे पवनपार बिटात मोह फुले वेचायला ग्रामस्थ गेले असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने सुरेश लोनबले वय 50 राहणार पवनपार याला ठार केलेघटनेची माहिती होताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांनी क्षणा चाही विलंब न करता घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला
