वर्दळीच्या मार्गावर फास्टट्रॅक सेवा कुचकामी



 बल्लारपूर :- (ताहीरशेख )बल्लारपूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या विसापूर टोल नाक्यावर गुरुवारी मध्यरात्री 11 वाजताच्या सुमारास ट्रॅफिक जाममध्ये एक रुग्णवाहिका अडकली. त्यामधील रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती. ही बाब संदीप पोडे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पुढाकार घेऊन ती रुग्णवाहिकेला तिथून काढल्यामुळे अनर्थ टळला. मात्र, या प्रसंगावरून वर्दळीच्या मार्गावर फास्टट्रॅक सेवा कुचकामी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.ट्रैफिक जाममुळे रुग्णाच्या जिवावर बेतणाऱ्या या प्रसंगातून रुग्णवाहिकेची सुटका झाली. विसापूर टोल नाक्यावर मध्यरात्री ट्रैफिक जाममध्ये रुग्णवाहिका अडकल्यामुळे एका रुग्णाचा जीव धोक्यात आला होता. प्रसंगावधान साधून संदीप पोडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह टोल नाक्यावरील कर्मचारी व पोलिसांची मदत घेऊन ती रुग्णवाहिका तिथून सुखरूप बाहेर काढली. त्यामुळे अनर्थ टळला. येथे ओव्हरलोड ट्रकची रनिंग काट्यावर मोजणी होत असल्याने नेहमीच वाहनांच्या रांगा लागल्या असतात. त्यामुळे फास्टट्रॅक असून सुद्धा ते कुचकामी ठरत आहे. सार्वजनिक व प्रवासी गाड्यांसाठी लेन वेगळी असून सुद्धा ट्रैफिक जाममुळे त्यांना तिथे पोहोचता येत नाही व असे अडचणीचे प्रसंग नेहमीच घडत आहे. यावर त्वरित टोल व्यवस्थापनाने उपाययोजना करून पुन्हा असा प्रसंग घडू नये, याची काळजी घ्यावी, अन्यथा टोलनाक्याविरुद्ध उग्र आंदोलन करू, असा इशारा युवा नेते संदीप पोडे यांनी दिला.
Post a Comment (0)
Previous Post Next Post