गावस्तरावर राष्ट्रसंतांच्या समग्र साहित्याचे प्रदर्शन ही अभिनव संकल्पना - विलास उगे



 राजुरा :- राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी ग्रामविकासाचा  विचार दिला.  प्रत्येक  गाव स्वच्छ आणि व्यसनमुक्त व्हावे, गावातील तरूण उद्योगशील बनावा हे त्यांचे स्वप्न होते. ग्रामजयंती महोत्सवाच्या निमित्ताने मानोली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले ही संकल्पना अभिनव असल्याचे मत राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष विलासराव उगे यांनी व्यक्त केले. माजी आमदार तथा ज्येष्ठ विचारवंत ऍड . वामनराव चटप यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले. ग्रामजयंती महोत्सवाच्या निमित्ताने मानोली (बु. )येथे श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.  अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक  ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. केंद्रीय प्रचार समिती सदस्य एड. राजेंद्र जेनेकर, जिल्हा प्रचार प्रमुख  लुटारू मत्ते गुरुजी, एड. सारिका जेनेकर, जाहिर खान गुरुजी, सुभाष पावडे, शैलेश कावळे, अनिल चौधरी, राजकुमार चिंचोळकर, मनोहर पासपुते, गणपतराव अडवे, नारायणराव अडवे, नानाजी देवाळकर, वामनराव अडवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गावातून साहित्य दिंडी काढण्यात आली.तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे ग्रंथ प्रदर्शन मंडळाचे मुख्य फलकाजवळ ज्येष्ठ साहित्य प्रसारक रामदास चौधरी यांनी लावले होते. याप्रसंगी खेळात प्राविण्य प्राप्त वैभव रमेश अडवे, अभियांत्रिकी पदवी प्राप्त केतन अडवे, श्रमदानाचे उत्स्फूर्त कार्य करणारे मोहन पेरकंडे ,  युवा ग्रामीण पत्रकार प्रकाश देवगडे, कवयित्री सारिका जेनेकर , साहित्य प्रसारक रामदास चौधरी  आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.  सायंकाळी सामुदायीक प्रार्थनेच्या महत्त्वावर  ज़हीर खान गुरुजी यांचे अभ्यासपूर्ण भाषण झाले.रात्री सप्तखंजेरीवादक कु.क्रांती मंगेश काळे हिचे समाजप्रबोधनपर कीर्तन झाले.कार्यक्रमासाठी  मानोली शाखेचे अध्यक्ष  मनोहर पासपुते, उपाध्यक्ष पांडुरंग विरुटकर ,सचिव मारोती लोहे,खुशाल अडवे,बाळकृष्ण झाडे,अनिकेत कोंडे,सुरज पेरकंडे,श्रावण पासपुते आदींनी अथक परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर लांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश अडवे यांनी केले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post