चंद्रपूर :- जगन्नाथ बाबा नगर येथे देशी दारूचे दुकान उघडण्यात आले. याविषयी तीव्र संताप या नगरातील नागरिक व्यक्त करीत आहॆ. या परिसरात जगन्नाथ बाबा मठ व मंदिर तसेच श्री बालाजी मंदिर या सारखी धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे या दारू दुकानाचा निषेध व ते बंद करण्यात यावे असे एक निवेदन याच परिसरातील नवजीवन योग मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य तसेच स्त्री व पुरुष योगसाधकाद्वारे जगन्नाथ बाबा नगर दारूबंदी संयुक्त संघर्ष समिती मार्फत प्रशासनाला दिले आहॆ.
या निवेदनावर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नगरवासियातर्फे नवजीवन योग मंडळाचे अध्यक्ष श्री गौरशेट्टीवर, सचिव श्री. मधुकर राजूरकर, सदस्य श्री. भालचंद्र डहाके, श्री. चिलके व श्री. सूर्यनारायण ह्यांनी आपल्या उदघोषणातून दिला.या प्रसंगी सर्वश्री गोरशेट्टीवार, राजूरकर, सूर्यनारायण, चिलके तसेच महिला सदस्य सौ. वानिता राजूरकर, सौ. प्रार्थना राजूरकर, सौ. प्रीती एकरे, सौ. कविता लुनावत, सौ. कष्टी ताई, सौ राव ताई व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

