पंकज गुप्ता यांची यंग चांदा ब्रिगेडच्या शहराध्यक्षपदी निवड





 चंद्रपूर :- पंकज गुप्ता यांची यंग चांदा ब्रिगेडच्या शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. आमदार जोरगेवार यांनी नियुक्ती पत्र देत हि नियुक्ती केली आहे. पंकज गुप्ता हे मागील अनेक वर्षापासून यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून समाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करित आहे. त्यांच्या नेतृत्वात अनेक समाजिक उपक्रम घेण्यात आली आहे. याची दखल घेत त्यांना पदोन्नती देण्यात आली असून यंग चांदा ब्रिगेडच्या शहराध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमूख उपस्थितीत सदर नियुक्ती करण्यात आली असून आमदार किशोर जोरगेवार यांनी नियुक्तीपत्र देत पंकज गुप्ता यांना शुभेच्छा दिल्या आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणीकरित्या पार पाडुन यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या गरजु पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करेल. सर्वसामान्यांना न्याय देण्याची माझी भुमिका असेल असे यावेळी नवनियुक्त शहराध्यक्ष पंकज गुप्ता यांनी म्हटले आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post