वाघाच्या हल्ल्यात सहा जनावरे ठार


गोंडपिपरी  : गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील गोशाळेवर रात्रीच्या सुमारास वाघाने हल्ला करून सहा जनावरांना ठार केल्याची घटना घडली.कृष्णा गोशाळा गोंडपिपरी / तोहगाव सेवा समितीकडून चालविल्या जाते. या शाळेत १२५ जनावरे असून सदर गोशाळा जंगलाशेजारी आहे. ३१ मार्चच्या रात्री वाघाने या शाळेतील जनावरांवर हल्ला करून सहा प्राण्यांना ठार केले. या प्रकाराची माहिती गोशाळा संचालक सचिन चौधरी यांना समजताच त्यांनी वनाधिकारी धाबा यांना माहिती दिलीअसता तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर गोशाळा काही महिन्यांपूर्वी कोठारीत भर वस्तीत होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर त्यास तोहोगावात जंगलाशेजारी असलेल्या शेतात हलविण्यात आली. सदर शेतीला ताराचे कुंपण आहे. रात्रीच्या सुमारास वाघाने तार कंपाउंडच्या आत प्रवेश करून जनावरांवर हल्ला करीत सहा जनावरे ठार केली. वाघाच्या दहशतीमुळे ४० ते ५० जनावरे बेपत्ता झाले आहेत. त्याची तक्रार कोठारी पोलिसांत करण्यात आली असून बेपत्ता जनावरांचा शोध सुरू आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post