चंद्रपूर :- योग नृत्य परिवार चंद्रपूर तर्फे भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. योग नृत्य चे संस्थापक गोपालजी मुंधडा यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.किशोरीताई हिरुडकर, वर्षा तिजारे मॅडम , राधिका मुंधडा, नसीम चारनिया, मंगेश खोब्रागडे, प्रमोद बोरीकर, राजूरकर , टेकाम , रायपूरे इत्यादी मान्यवरांनी बाबासाहेबांचा जिवांकार्यावर मार्गदर्शन केले . संस्थापक गोपालजी मुंधडा यांनी अध्यक्षीय भाषण केले.
आझाद गार्डन ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयापर्यंत अभिवादन रॅली काढन्यात आली.या कार्यक्रमाचे संचालन धनंजय तावाडे यांनी केले तर आभार पौर्णिमा चांदेकर यांनी मानले. कार्यक्रमात केंद्रीय प्रभारी , केंद्र प्रमुख व अनेक शाखेचे प्रशिक्षक व सदस्य उपस्थित होते.

