महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक संघटने तर्फे महाकाली यात्रेला आलेल्‍या सर्व भाविक भक्‍तांना महाप्रसाद वितरीत – राजेंद्र खांडेकर



 चंद्रपूर :- महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक संघटने तर्फे आज दिनांक १६ एप्रिल २०२२रोजी हनुमान जयंती निमित्‍त महाकाली यात्रेला येणा-या भाविक भक्‍तांना महाप्रसाद वितरीत करण्‍यात आले. या महाप्रसादाचे उद्घाटन ऑटोरिक्षासंघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर, रविंद्र धकाते, चंद्रकांतधामनगे, विवेक धामनगे, अभय तलार, किरण मस्‍कावार, अमित गर्गेलवार, रितेशधकाते, सुर्यकांत धामनगे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत हा महाप्रसाद वितरण कार्यक्रम घेण्‍यात आला. 


या महाप्रसाद स्‍वाद असंख्‍य भाविक भक्‍तांनी घेतला. हा कार्यक्रम यशस्‍वी करण्‍याकरीता चंद्रपूर शहरातील असंख्‍यऑटोरिक्षा चालक मालकांनी स्‍वयंखुशीने मदत केली.
Post a Comment (0)
Previous Post Next Post