सुनील डोंगरे मित्र परिवारातर्फे गुढीपाडव्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम


चंद्रपूर :- चैत्र शुद्ध प्रतिपदा वसंत ऋतुचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आला. या मराठी नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरिता   सुनिल डोंगरे मित्रपरिवाराच्या व महिला मंडळ प्रस्तुत  यांच्या संयुक्त विधमाने  गुढीपाडव्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये एकल नृत्य स्पर्धा वय वर्ष 7 ते 12, फ्रांसी ड्रेस स्पर्धा वय वर्ष 2 ते 6 तसेच महिलांसाठी समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आली. यावेळी स्पर्धेचे पुरस्कार भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा महामंत्री सुनील डोंगरे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना प्रोत्साहन बक्षीस व शील्ड देण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांकडून उत्स्फुत असा प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया काळे, नीलिमा गौरकार, दीपिका सेलोकर, अर्चना मोरे, दिव्या चलकलवार, सुनीता गौरकार, अजूशा दलाल, शारदा ताजने, अनिता गेघाटे, कल्पना कोयलवार, कविता चामलवार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन श्राद्ध एडलावार यांनी केले. या कार्यक्रमाला  वार्डातील महिला, पुरुष व युवावर्गाची मोठी उपस्थिती दर्शवली होती होती.
Post a Comment (0)
Previous Post Next Post