रात्री घरात शीरला बीबट. सकाळी आठ वाजता वनवीभागाने केले जेरबंद



सावली :- तालुक्यातील उसेगाव येथील भगवान आवारी यांच्या घरात रात्रोच्या सुमारास बीबट शीरला. यामुळे घरातील मंडळी भयभीत झाली. मात्र सकाळी आठ वाजता वनवीभागाने बीबट्याला जेरबंद केल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा नी:श्वास सोडला. सावली पासून सात की. मी अंतरावर असलेल्या उसेगाव येथील भगवान आवारीच्या घरात रात्री बीबट शीरला. पहाटे चार वाजताच्या दरम्यान भगवान ची आई सींधुबाई लघुशंकेसाठी उठली असताना खाटेच्या खाली काही तरी असल्याची जाणीव झाली. डोकावून बघीतले असता बीबट्याला पाहुन भंभेरी उडाली. दरम्यान सदर बीबट्याने सुन शशीकलाबाई हीच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून शशीकला घराबाहेर पडली. आणि घराचे दार बाहेरून बंद केले. तोपर्यंत घरातील संपुर्ण सदस्य बाहेर पडले होते. ही घटना गावात पसरताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. वनविभागाच्या चमुने घटनास्थळ गाठून सकाळी आठ वाजताच्या सुमारास बीबट्याला पींजऱ्यात कैद केले. यावेळी वनवीभागाचे वीभागीय अधिकारी प्रशांत खाडे, सावली चे वनपरिक्षेत्राधिकारी वसंत कामडी, ठाणेदार आशिष बोरकर, ईको प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे सावली चे क्षेत्रसहाय्यक राजु कोडापे तसेच ईतर अधीकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर बीबट हा अडीच ते तीन वर्ष वयाचा असुन शेळ्या आणि कोंबड्यांवर ताव मारण्याचा हेतुने गावात येत होता. मात्र मध्यवस्तीत शीरुन शीकार करण्याच्या नादात तो घरात शीरला. यामुळे गावकरी अजुनही भयभीतच आहेत. भविष्यात अशा घटना घडु नये याकरीता वनवीभागाने सतर्कता दाखवीणे आवश्यक आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post