७ एप्रील पासून अशोक तुमराम यांचे आमरण उपोषण
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागात अनेक बोगस आदिवासी कर्मचारी कार्यरत आहेत. यामुळे खरे आदिवासी त्यांच्या लाभापासुन वंचीत आहेत. दि. २१ डीसेंबर २०२१ चा अधिसंख्य कर्मचा-यांच्या सेवासमाप्तीचा शासन निर्णय असतांना सुध्दा या बोगस कर्मचा-यांवर कारवाई न करता त्यांना संरक्षण दिल्या जात आहे. ही फारच गंभीर व आक्षेपार्ह बाब आहे. उपोषणकर्ते श्री. अशोक तुमराम हे मागील २७ वर्षापासुन छोटूभाई पटेल हायस्कुल, चंद्रपूर येथे सहा. शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते उपमुख्याध्यापक पदाचे दावेदार असुन सुध्दा बोगस आदिवासींनी ती जागा बळकावल्यामुळे या पदोन्नतीपासुन वंचीत राहिले आहेत. शाळा व्यवस्थापन समिती या बोगस आदिवासी व्यक्तिला संरक्षण देत असुन अशोक तुमराम यांना मानसिक त्रास देत आहेत. हा अन्याय असहय झाल्याने अशोक तुमराम दि. ७ एप्रील २०२२ ला दुपारी ३.०० वाजेपासून जिल्हा परिषद, चंद्रपूर समोर खालील मागण्यांसाठी आमरण उपोषण करीत आहेत.
१) जिल्हा परिषद, चंद्रपूरच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या अधिसंख्य कर्मचा-यांच्या सेवा समाप्त करून त्या जागी ख-या आदिवासींना नियुक्त करण्यात यावे. २) या अधिसंख्य कर्मचा-यांना संरक्षण देणा-या अधिकारी व शाळा व्यवस्थापन समित्यांवर सखोल
चौकशी करुन अॅट्रॉसीटी अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी. या अधिसंख्यतेमुळे अशोक तुमराम यांना नाकारलेली उपमुख्याध्यापक पदाची पदोन्नती त्वरीत देण्यात यावी. ३)
४) अशोक तुमराम हे कार्यरत असलेल्या छोटूभाई पटेल हायस्कुल, चंद्रपूरच्या शाळा व्यवस्थापन समितीची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर अॅट्रॉसीटी अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी. जर एकटया चंद्रपूर जिल्हा परिषदेत अशी परिस्थिती असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात काय हाल
असतील ? असा प्रश्न प्रत्येक आदिवासींच्या मनात निर्माण झाला आहे. असंख्य जागा बोगस आदिवासींनी बळकावल्याने खरे आदिवासी तरुण रोजगारापासुन वंचीत राहिले आहेत. याला जबाबदार कोण ? हा सवाल आदिवासी समाज प्रशासनाला करीत आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढून समस्या निराकरण करण्यात यावे अशी एकमुखी मागणी आदिवासी समाजाकडून करण्यात येत आहे. पत्र परीषदेस श्री. जीतेश कुळमेथे, अशोक उईके, चरणदास भगत, वामन गणवीर, प्रिती मडावी, वैशाली मेश्राम, जमुना तुमराम व इतर आदिवासी बांधव उपस्थित होते.
