चंद्रपूर :- चंद्रपूर येथील बिनबा गेट परिरातील मोठ्या प्रमाणात खड़े होते या बद्दलचे निवेदन काही दिवसापूर्वी येथील रहिवासी भाजपचे जिल्हा सचिव चाँद सय्यद व सचिन बोबडे यांनी उपमहापौर राहुल पावडे यांना दिले होते या परिसरात जागोजागी खड्डे पडले असल्याने याठिकाणी अपघात होऊ नये याची तात्काळ दखल घेत मनपाचे उपमहापौर राहुल पावडे यांनी संबंधित विभागाला सूचना केली होती त्या सूचनेची तात्काळ दखल घेत बिनबा गेट परिसरात जिथे खड्डे होते तिथे आता पेव्हर ब्लॉकचे काम उपमहापौर राहुल पावडे यांच्या तात्काळ घेतलेल्या निर्णयामुळे झाले असल्याचे मत येथील रहिवासी व भाजपाचे जिल्हा सचिव चांद सय्यद व सचिन बोबडे यांनी म्हटले आहे
