विकासकामांच्या जोरावर विजयाचा विश्वास
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नगीनाबाग प्रभाग क्रमांक ९ मधून भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल पावडे यांनी प्रचाराला वेग दिला आहे. मतदारांच्या दारोदारी पोहोचून त्यांनी थेट संवाद साधला असून, गेल्या काळात केलेल्या विकासकामांच्या बळावर मतदारांचा आशीर्वाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नगीनाबाग प्रभागातून भारतीय जनता पक्ष- शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राहुल लता बाळकृष्ण पावडे, प्रशांत एकनाथ चौधरी, सविता राहुल कांबळे आणि शितल मुकेश आदे यांना कमळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन राहुल पावडे यांनी केले. ‘निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा’ अशा घोषणेने प्रचाराची सांगता करताना त्यांनी प्रचंड बहुमताने सर्व उमेदवारांना विजयी करण्याची विनंती मतदारांना केली.प्रचारादरम्यान बोलताना राहुल पावडे म्हणाले, ‘राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आम्ही रस्ते, नाली, वीज पुरवठा, शुद्ध पाणी यासह शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास सातत्याने केला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा, शहराचे सौंदर्यीकरण, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक बाबी, महिला सुरक्षेचे विषय अशा विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामे पूर्ण केली आहेत. ही कामे मतदारांना दिसत आहेत आणि त्यामुळेच त्यांचा पाठिंबा आम्हाला मिळेल.’नगीनाबाग प्रभागात राहुल पावडे यांच्यासह इतर भाजपा उमेदवारांनी घरोघरी जात मतदारांशी संवाद साधला आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मतदानाचे आवाहन केले. प्रचाराची ही झंजावात पाहता प्रभागातील वातावरण भाजपाच्या बाजूने असल्याचे दिसते.