मुंबईच्या संघामध्ये चंद्रपुरातील नगीना बाग प्रभागातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग!
चंद्रपूर :- चंद्रपूर येथील बल्लारपूर येथे महिलांची दुसरी राष्ट्रीय टेपबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २६, २७ आणि २८ ऑक्टोबर या कालावधीत बल्लारपूर तालुका विसापूर येथील स्टेडियम मध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत नगीनाबाग प्रभागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला होता. भाजपचे माजी महानगर अध्यक्ष तथा महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या हस्ते सदर स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये हरियाणा, नवी दिल्ली, जम्मू कश्मीर, तामिळनाडू, आसाम, ओरिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, आणि मुंबई, अशा एकूण नऊ राज्याच्या संघाने सहभाग घेतला होता या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य महिला टेपबॉल कौन्सिलिंग तर्फे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाच्या कर्णधार प्रीती निंदेकर यांनी महत्वपूर्ण भूमिका निभवली तीन दिवशीय चाललेल्या स्पर्धेमध्ये अनेक चुरशीचे सामने झाले अंतिम सामन्यांमध्ये ओडिसा संघाने दमदार खेळ करत मुंबई संघातर्फे पण उत्कृष्ट खेळ करत उपविजेता पद पटकाविले आहे. या सामन्यामध्ये ओडिसा व मुंबईच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या कर्णधार वैशाली आवळे, तसेच राधिका शिरसागर, नम्रता आमटे, रचना सहारे, सपना ठमके, स्वीटी पारधी, पूजा कोठारी,मीना निषाद,लक्ष्मी आडे, रूपाली सहारे प्रेरणा रणदिवे, श्वेता आईंचवार, यांनी उत्कृष्ट कामगिरी करून सामन्यात आपल्या संघाला उपविजेता पद मिळवून दिल्याबद्दल या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे चंद्रपूर शहरातील नगीना बाग प्रभागातील महिला खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून चंद्रपूरचे नाव रोशन केले.