लोहारा येथील घटना आणखी किती जीव जाणार.
चंद्रपूर :- चंद्रपूर कडे येणाऱ्या रेल्वेच्या धडकेत एका मादी सांबराचा दुर्दैवी मृत्यू 12 ऑक्टोबर ला झाला. ही घटना वनविकास महामंडळाच्या मामला वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 410 मध्ये ही घडली. 2025 ह्या वर्षी 19 जानेवारी ला एक वाघ, 25 मे एक अस्वल, 28 जून सांबर व गर्भातील पिल्लू, 30 ऑगस्ट 2 अस्वलीचा, 5 जुलै एक रानगवा, 8 सप्टेंबर एक सांबर, 17 सप्टेंबर एका बिबटचा, आणि आज 12 ऑक्टोबर ला एका मादी सांबराचा मृत्यू अश्या एकूण, 1 वाघ, 1 बिबट, 3 अस्वल, 4 सांबर, 1 रानगवा अश्या एकूण 10 वन्यप्राण्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.मृत्यूचा सापळा ठरलेला बल्लारशाह-गोंदिया आजपर्यंत असंख्य वन्यजीवांचा रेल्वे अपघातात मृत्यू झालेला असून, वन्यजीवासाठी उपाय योजना संदर्भात रेल्वे प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे, वेळीच उपाय योजना म्हणून उपशमन योजना रबविल्या असत्या तर अनेक वन्यजीवांचे जीव हे वाचले असते.बल्लारशाह - गोंदिया हा रेल्वे मार्ग चंद्रपूर, ब्रम्हपुरी, नागझिरा, गोंदिया ह्या भागात असलेल्या जंगलातून जात असल्याने वन्यजिवांचे भ्रमनमार्ग बाधित झाले असल्याने, एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, परिणामी वन्यजीवांचे रेल्वे अपघातात जीव गमवावा लागत आहे.बल्लारशाह - गोंदिया हा रेल्वे मार्ग तेलंगणा येथील कावल व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्रातील कन्हाळगावं अभयारण्य, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प -उमरेड कऱ्हाडला- नवेगावं- नागझिरा ह्या भ्रमनमार्गाला बाधित करत आहे, एवढा महत्वाचा भ्रमन मार्ग असतांना रेल्वे प्रशासन व वनविभाग अजूनही उपशमन योजना रबवीण्यास का अपयशी ठरल हा मोठा प्रश्न चिन्ह आहे.घटनास्थळी हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी चे अध्यक्ष दिनेश खाटे, अमित देशमुख, नाजिश अली, अभिषेक गजभे, वनविकास महामंडळाचे मामला परिक्षेत्रातील क्षेत्र सहहायक खडगी, स्वामी व वनमजूर घटनास्थळी उपस्थित होते.