राहुल पावडे यांच्या नेतृत्वात 22 हजाराहून अधिक सदस्य नोंदणी
चंद्रशेखर बावनकुळे व सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून राहुल पावडे यांचे अभिनंदन
चंद्रपूर :- 22 जानेवारीभाजपाच्या चंद्रपूर महानगरचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले असून, त्यास महानगरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानांतर्गत जवळपास 22 हजाराहून अधिक सदस्य नोंदणी करण्यात आली. राहुल पावडे यांनी पदाधिकार्यांसोबत बैठक घेऊन 22 हजार सदस्य नोंदणीचा आकडा पार केला आहे.प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे की, राहुल पावडे यांनी स्वतः आपल्या रेफरल कोडवरून हजार सदस्यांची नोंदणी करून घेतली आहे. त्याच सोबत महानगरातील 22 हजाराहून अधिक नागरिकांची सदस्य नोंदणी झाली आहे. या चांगल्या प्रयत्नांसाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच माजी पालकमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल पावडे यांचे अभिनंदन केले आहे.बावनकुळे कौतुकाने म्हणाले, भाजपाचे अंत्योदयाचे धोरण आपण जनमानसात घेऊन जात आहात. यातून आपली लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते. आपल्या या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणून मला आदर आणि अभिमान वाटतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची मान जगभरात उंचावली आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र थांबणार नाही, याची सर्वांना खात्री आहे. संघटनपर्वात हजारो सदस्य भाजपासोबत जोडून आपण संघटना बळकट केलीच आहे. शिवाय महाराष्ट्राच्या विकासासाठीचे दूतही आपण जोडून घेतलेले आहे त्याबद्दल बावनकुळे यांनी, राहुल पावडे यांचे अभिनंदन केले.
अधिक नोंदणीसाठी सज्ज राहण्याचा संकल्पमहानगराचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने आपण हे लक्ष्य साधू शकतो. पण यापेक्षा अधिक सदस्य नोंदणी करण्यासाठी आपण संकल्प केला पाहिजे, असे आवाहन पावडे यांनी केले आहे.