चंद्रपूर :- मागील काही दिवसापासून चंद्रपुरात सातत्याने गोळीबाराच्या घटना होत आहेत. अवैद्य धंद्याचे माहेरघर असलेल्या आणि कोळसा तस्करीत डॉन समजणाऱ्या कुख्यात हाजी सर्वर शेख आज दिवसाढवळ्या चंद्रपूर शहरातील बिंनबा गेट परिसरामध्ये असलेल्या शाही दरबार या हॉटेलमध्ये जेवण करत असताना सात अज्ञात आरोपीने गोळ्या झाडल्याने गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.जुन्या जुन्या वादातून हाजी सर्वर शेख याच्यावर आरोपींनी आपल्या बंदुकीतून गोळ्यांच्या फायरी केल्या हाजी सर्वर शेख याचे नुकताच कारागृहातून सुटका झाल्याचे कळते, हाजी सर्वर शेख यांची मागील पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून अवैध कोळसा व्यापारात त्याचा फार मोठा दरारा होता. त्याच्या अनेक गुन्हे दाखल होते. गुन्हेगारीतला बादशहा म्हणून त्याची ओळख ही होती. त्यामुळे चंद्रपुरातील वाढत असलेल्या गुन्हेगारीतील एक मोठं नाव समाप्त झाल्याचे बोलल्या जात आहे. हाजी सर्वर शेख हत्या जुन्या वादातून झाल्याचे सांगितले जात आहे. या हत्येनंतर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी घटनास्थळाची पाहणी करून हाजी सर्वर शेख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करू असे यावेळी सांगण्यात आले होते.पुढील तपास सुरू आहे.