प्रधान सचिव व जिल्हाधिका-यांची औ.प्र. संस्थेला भेट*


चंद्रपूर :- कौशल्य विकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा तसेच जिल्हाधिकारी संजय मीना यांनी 30 डिसेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आलापल्ली व औद्योगिक प्रशिक्षक संस्था जिमलगट्टा येथे सदिच्छा भेट दिली.त्यांनी यावेळी संस्थेच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि कार्यशाळेतील प्रत्येक व्यवसायात जाऊन सदर व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांशी मैत्रीपूर्णसंवाद साधून प्रशिक्षणाबाबत चौकशी केली. तसेच उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी कर्मचा-यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. संस्थेच्या आमूलाग्र बदलासाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना केल्या. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य वैभव बोनगीरवार, आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post