चंद्रपुरतील उच्चपदस्थ अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात


आरोपी एलसीबीच्या ताब्यात

 चंद्रपूर :- हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून चंद्रपूर शहरातील एका उच्चपदस्थ अधिका-याला 50 लाख रुपयांची मागणी करणा-या काही आरोपींविरुद्ध एलसीबीच्या पथकाने गुन्हे दाखल केले आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. परंतु, शहरात उघडकीस आलेल्या या हनीट्रॅपच्या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली आहे.
झाले असे की, काही महिन्यांपूर्वी शहरातील एका उच्चपदस्थ अधिका-याला एका महिलेने एक महिला आपल्याला भेटू इच्छित असल्याची बतावणी केली. त्यानंतर अधिका-याशी संपर्क साधून त्या दोघांची भेट घडवून आणली. एका रुमध्ये नेवून दोघांचेही छुप्या पद्धतीने अश्लील व्हिडीओचे चित्रिकरण केले. यानंतर काही दिवसांनी एका महिलेने सदर अधिका-याशी संपर्क साधून अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याचे सांगितले. मात्र, हे प्रकरण निपटविण्यासाठी 3 लाख रुपये देण्याची मागणी केली. तेव्हा अधिका-याने घाबरून काही रक्कम दिली. मात्र, सहा महिन्यानंतर पुन्हा त्या अधिका-याला अज्ञात इसमाने कॉल करून 50 हजार रुपये द्या. अन्यथा अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याच त्रासाला कंटाळून सदर अधिका-याने याबाबत पोलिसांत तक्रार देत आपबीती  केली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींविरुद्ध सापळा रचून कारवाई केली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी सादिक खान व झिबल भारसाखरे यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणात आणखी तीन महिलांचा समावेश असल्याचे बोलल्या जात आहे. आरोपी सादीक खान, झिबल भारसाखरे व इतर तीन महिला आरोपीविरुद्ध चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात कलम 384, 385, 34 भादंवि अन्वये खंडणीचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post