महेश मेश्राम हत्याकांड प्रकरणी आणखी एकास अटक



चंद्रपूर :- दुर्गापूर येथील महेश मेश्राम या युवकाची अत्यंत क्रूर प्रकारे दुर्गापूर रोड तुकूम परिसरातील एका बियर बारच्या समोर हत्या करण्यात आली होती. दरम्यान याप्रकरणात एकूण 10 आरोपींना पोलिसांनी अटक केल्यावर आता पुन्हा एका आरोपीस अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
7 नोव्हेबरला रात्री 10 वाजता नंतर घडलेल्या या क्रूर हत्याकांडामुळे दुर्गापूर परिसरात चांगलीच दहशत माजली होती. रात्री एका बार मधून निघाल्यावर 35 वर्षीय महेश मेश्राम यांच्यावर एका टोळीने हल्ला केला. या हल्ल्यात महेशचे शीर धडावेगळे करीत, आरोपीनी शिरा सोबत फुटबॉल सारखा खेळ खेळला. जवळपास अर्धा तास या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. घटनेनंतर काही वेळातच जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी घटनास्थळी दाखल होत आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश ही दिले. घटनेच्या रात्री मुख्य 2 आरोपी दुर्गापूर पोलिसांनी पकडले. त्यानंतर 8 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
आता पुन्हा दुर्गापूर पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून या प्रकरणी आता एकूण आरोपींची संख्या 11 झाली असून सर्वाना पुन्हा 4 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post